हलगा येथील घटना : साथीदार फरार
प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी मध्यरात्रीनंतर हलगा येथील एका हॉटेलमध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱया तरुणाला रंगेहाथ पकडून त्याला चोप देण्यात आला आहे. त्याचा साथीदार जमावाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेऊन पळाला आहे.
कुमार ऊर्फ देवेंद्र (वय 23, रा. बस्तवाड) असे जमावाच्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर हिरेबागेवाडी येथील सरकारी इस्पितळात उपचार करण्यात आले. एका हॉटेलमध्ये चोरीचा प्रयत्न करताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
संतप्त जमावाने चोप दिल्यानंतर या तरुणाला हिरेबागेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याचा आणखी एक साथीदार फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.