वृत्त संस्था/ अबु धाबी
एफ-वन मोटार रेसिंग ग्रा प्रि क्षेत्रातील येथे होणाऱया अबु धाबी ग्रा प्रि शर्यतीच्या शनिवारी झालेल्या तिसऱया आणि अंतिम सराव टप्प्यात हॉलंडचा चालक मॅक्स व्हर्स्टेपनने आघाडीचे स्थान मिळविले. पोलपोझिशन मिळविताना व्हर्स्टेपनने 1 मिनिट, 36.251 सेकंदाचा अवधी घेतला.
शनिवारी झालेल्या या शेवटच्या सराव टप्प्यात व्हर्स्टेपनने रेड बुल चालक सहकारी ऍलेक्स अल्बॉनला केवळ अर्ध्या सेकंदाने मागे टाकले. मर्सिडीस चालक आणि आतापर्यंत सातवेळा विश्वविजेतेपद मिळविणारा ब्रिटनचा हॅमिल्टन सहाव्या स्थानावर राहिला आहे. मॅक्लरेनचा नोरीस पाचव्या स्थानावर आहे. अबु धाबी ग्रा प्रि शर्यत रविवारी होणार आहे.