सध्या कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची संकल्पना राबविली आहे. या अनुषंगाने एकंदर बाहेरचे धोकादायक वातावरण पाहता आता अनेकांना आपल्या घरातच ऑफिस थाटणे गरजेचे ठरणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी काही महिने तसाच राहणार असल्याने होम ऑफिस संकल्पना वाढीस लागण्याची शक्यता बांधकाम क्षेत्रात वर्तविली जात आहे. नव्या घर बांधणीत घर मालकांकडून ऑफिससाठी स्वतंत्र खोली रचण्याची मागणी केली जाईल. तेव्हा आताच्या विकासकांना ही बाब लक्षात घेऊनच घरातच ऑफिससाठी म्हणून वेगळी जागा राखीव ठेवावी लागणार आहे.
रात ऑफिस करताना अनेक गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागतो. ऑफिसची रचना लिव्हिंग रुमजवळ कि किचनजवळ करायची इथपासून ऑफिसचा लेआऊट कसा असावा? अशा साऱया प्रश्नांची उत्तरे शोधूनच मग ऑफिसची रचना अंतिम करावी लागेल.
ऑफिसची रचना करताना आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यप्रणालीचा विचार करावा लागतो. ऑफिसमध्ये कितीजण बसणार आहेत. याचाही रचनेपूर्वी विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे आपला व्यवसाय किंवा नोकरी कशा प्रकारची आहे यानुसार ऑफिसची रचना करावी लागेल. ऑफिसमध्ये सहसा एक टेबल, खुर्ची, कॉम्प्युटर तसेच प्रिंटर असे घटक सहसा समावेश केले जातात. आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने यातील गोष्टी बदलल्या जातात.
ऑफिसची रचना –
ऑफिसची रचना ही उपलब्ध जागेनुसार करताना ती लपली जाईल याची पुरेपूर काळजी रचनेत घ्यावी लागते. एखाद्याला आत आल्यानंतर समजू नये अशा पद्धतीने ऑफिसची मांडणी करायला हवी. यासाठी दरवाजे, पडदे यांचा वापर करणे गरजेचे आहे. अशा ऑफिसेससाठी आपोआप उघडणारे दरवाजे सोयीचे ठरतात. यासाठी अर्धे काचेचेही दरवाजे योग्य ठरतात. ऍल्युमिनीयम प्रेम, लाकडी प्रेम यांचा वापर करून ऑफिस बनवता येते.
रचना कुठे कराल –
घरात ऑफिस स्थापायचं ठरवल्यावर ते घरातच कुठे सामावयाचं हा प्रश्न पडतो. मुळात राहण्याव्यतिरीक्त इतर मोकळी जागा आहेच का घरात हे आधी पाहावं. घरातील किती सदस्य ऑफिसमध्ये काम करणार आहेत यावर ऑफिसचा एकूण आकार निश्चित होत असतो. ऑफिस शक्यतो किचनजवळ असावे किंवा मास्टर बेडरुमजवळही याची रचना करता येते. घराच्या प्रवेशद्वारात लिव्हिंगरूममध्ये ऑफिस रचता येते. पण हे करताना ऑफिस एकदम दरवाजात होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. तसं पाहता लिव्हिंगरूम ही ऑफिससाठी योग्य म्हणता येईल. कारण बऱयाच घरांमध्ये ही खोली इतर खोल्यांच्या तुलनेत आकाराने मोठी असते. खोलीच्या एकंदर रचनेचा अभ्यास करून त्याप्रमाणे ऑफिसची मांडणी करता येते.
असं असावं ऑफिस
होम ऑफिसची संकल्पना येणाऱया काळात वाढणार असून त्यादृष्टीने घरातच ऑफिस रचणे सोयीस्कर ठरणार आहे. कोरोनामुळे घरातून काम करण्याशिवाय आता गत्यंतर उरलेले नाही. बाहेरच्या कोरोनाच्या धोक्याचा विचार करता आपल्या घरातच ऑफिस थाटणे योग्य ठरते. येणाऱया काळात होम ऑफिसचे कल्चर अधिक वाढणार आहे.
ऑफिसचा घरातच अंतर्भाव करताना कोणत्या गोष्टींचा साकल्याने विचार करावा लागतो ते पाहु.
स्टोरेज
ऑफिस स्थापन करायचे झाल्यास अनेक गोष्टी तेथे सामावल्या जातात. या गोष्टी ठेवण्यासाठी तेथे पुरेशा जागेची गरज असते. फायली ठेवण्यासाठी ड्रॉव्हर्स, पिन बोर्ड, ट्रे, पुस्तके ठेवण्यासाठी कप्पे अशी व्यवस्था तेथे करावी लागते. ऑफिसमध्ये भिंतीवरच्या जागेचा स्टोरेजसाठी उपयोग करता येतो. मॅगझिन रॅक, पुस्तकांचे रॅक तयार करून घेता येते. बुक केसचा वापरही ऑफिसमध्ये करता येतो.
फर्निचर-
ऑफिसमध्ये फर्निचरची मांडणी करताना टेबल किंवा डेस्क आणि खुर्ची हे दोन महत्त्वाचे घटक असतात. यांना खोलीच्या मध्यभागी किंवा एका बाजूला रचणे योग्य ठरते.
टेबल- ऑफिसमध्ये असणाऱया टेबलाची उंची योग्य असायला हवी. जमिनीपासूनची टेबलाची उंची 29 इंच इतकी असावी. आजकाल उंची वाढवता येणारी टेबलेही बाजारात मिळतात. घरात सदस्यांची उंची कमी-जास्त असणाऱयांनी अशा टेबलाचा वापर करायला हरकत नाही.
खुर्ची- ऑफिसमध्ये वापरण्यात येणारी खुर्चीदेखील कार्यालयीन कामकाजासाठीची वापरणे योग्य ठरते. खुर्चीवर बसल्यानंतर आपली पाठ सरळ राहील हे पाहावे. आज-काल बाजारात उंची कमी-जास्त करता येणाऱया व्यवसायिक खुर्च्याही उपलब्ध आहेत. आरामदायी अशा हाताच्या खुर्च्या शक्मयतो वापराव्यात. फिरती, उंची कमीजास्त करता येणारी खुर्चीही घेता येते.
कॉम्प्युटर- ऑफिसच्या कामात कॉम्प्युटरचा वापर हा सर्वसामान्य झालेला आहे. कॉम्प्युटरचा मॉनिटर हा 25 ते 27 इंची असावा. शक्मयतो चांगल्या कंपनीचा मॉनिटर घेणे योग्य ठरते. स्वस्तातले मॉनिटर वापरल्यास डोळय़ावरती ताण येण्याची शक्मयता अधिक असते. टेबलावर ठेवल्यानंतर मॉनिटर डोळय़ाच्या समोर थोडय़ा उंचीवर असावा लागतो. चांगली इंटरनेट सेवादेखील कामासाठी गरजेची असते.
प्रकाश योजना
ऑफिससाठी चांगली प्रकाशयोजना असणे गरजेचे असते. त्यातल्या त्यात अगदी टेबलावर प्रकाशदिवा (टय़ुब वा दिवा)लावणे योग्य ठरते. याला अनुसरून एखादा टेबल लॅम्पही टेबलावर ठेवता येतो. लिहिता वाचता येईल एवढा स्वच्छ प्रकाश दिव्याचा असावा. सिलिंगमधील प्रकाश योजना ही जास्त सोयीची असते. ऑफिसमध्ये खिडकी असेल तर उन्हाळय़ात तीव्र सूर्यप्रकाशाचा काम करणाऱयाला त्रास होऊ शकतो. अशावेळी पडद्यांचा खिडक्मयांना वापर करता येतो. पडद्याच्या माध्यमातून अनावश्यक प्रकाश बाहेरच थोपवला जाऊ शकतो. ऑफिसमध्ये पुरेसा नैसर्गिक उजेड येईल याची काळजी घ्यावी, त्याकरीता खिडकीची रचना योग्य ठरते. खिडकी असल्यास ऑफिसमध्ये खेळती हवा राहून वातावरण ताजेतवाने राहते.
हिरवळ
रोपटय़ांमुळे खोलीला जीवंतपणा येत असतो. म्हणून त्यांची मांडणी घर असो की ऑफिस आवश्यकच असते. ऑफिसमध्ये जागा भरपूर असल्यास रोपटय़ांच्या कुंडय़ा ठेवता येतील. जेणेकरून वातावरणात ताजेपणा राहतो. खिडकीत किंवा अन्यत्र एका बाजुला भिंतीला लागून यांची मांडणी करता येते.
इतर गोष्टी
ऑफिसमध्ये एखाद्या भिंतीवर सुंदर वॉलपेपर लावता येतो. ऑफिसची शोभा या वॉलपेपरमुळे अधिकच वाढते. याखेरीज आपल्या जीवनशैलीशी निगडीत काही महत्त्वाच्या वस्तुंना येथे सामावता येते. कुटुंब सदस्यांचे फोटो, यशाची पारितोषिके, व चषक यांचीही मांडणी ऑफिसमध्ये करता येते. एखादं हसवणारं कार्टून चित्रही एका भिंतीवर लावता येईल.
अशा पद्धतीने आपण आपल्या ऑफिसची रचना लक्षवेधक, सोयीस्कर करू शकतो.