प्रतिनिधी / बेळगाव
बसवाण गल्ली, खासबाग येथे मागील 60 ते 70 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव साजरा केला जातो. पाच दिवस पारंपरिक पद्धतीने आरास केली जाते. होळीनिमित्त पाच दिवस कामधेनू आणि रतीदेवी मूर्तींच्या वेगवेगळय़ा रुपांमध्ये विशेष पूजा मांडण्यात येतात. त्यामुळे ही आरास पाहण्यासाठी व देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात.
रंगपंचमीच्या आदल्यादिवशी रात्री 12 वाजता मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात येते. त्यानंतर पाचव्या दिवशी खासबाग परिसरात धुळवड व रंगोत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सावासाठी गणपत पुजारी पाश्चापूर, आकाश आंबरोळे, विनायक वायकर, शैलेश कोलेलोहार, महादेव कोळी, प्रवीण कारगी, आकाश भस्मे, राजू महिंद्रकर, किसन कारजगी, अरुण मुरंगी, श्रीनिवास मुरंगी, शशिकांत क्षीरसागर यांच्यासह इतरांनी मेहनत घेतली.