प्रतिनिधी/ बेळगाव
1 नोव्हेंबर काळय़ा दिनी म. ए. समितीच्यावतीने मूक सायकलफेरी काढण्यात येते. 2016 साली काढण्यात आलेल्या या मूक सायकलफेरीवेळी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. त्यानंतर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवरच शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला. या खटल्याची सुनावणी येथील जेएमएफसी तृतीय न्यायालयात सुरू आहे. मात्र, ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलली असून पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे.
म. ए. समितीचे दत्ता येळ्ळूरकर, रामचंद्र पाटील, यशोधन नेसरकर, सचिन कदम, महेश परशराम पाटील, अंकुश बाळेकुंद्री, शंखू चोपडे, संतोष मुचंडीकर, भुजंग लाड, चांगदेश मुचंडीकर, सतीश कुगजी, रोशन पाटील, राहुल कुर्णी, राघवेंद्र येळ्ळूरकर, संदीप मोटेकर, राहुल पाटील, गजानन कोटे, बाळू जमादार, लोकनाथ रजपूत, सूरज शिंदोळकर, रवी मिरजकर, श्रीकांत मास्तमर्डी, राजू मजुकर, जयदीप उपासेकर, राजू हित्तलमनी, स्वप्नील देसाई, बाबू भडंगे, श्रीकांत कदम, श्रीनिवास पोल, सचिन पाटील, शंकर जाधव, नारायण पाटील, इंद्रजित पाटील, संदीप कडेमनी, विक्रम मासेकर, राहुल पाटील, सुशांत रेडेकर, किरण पिसे, विठ्ठल पाटील, संतोष बांडगी, मनोहर काकतकर, शोधना संग्राळकर, विजया घाटकर यांच्यावर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गेल्या चार वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मात्र, साक्षीदार आणि पंच उपस्थित नसल्यामुळे हा खटला पुन्हा पुन्हा पुढे ढकलत आहे. यातच कोरोनाही आल्यामुळे या खटल्याला विलंब झाला आहे. आता हा खटला 17 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे काम पाहत आहेत.