प्रतिनिधी/ बेंगळूर
खासगी बस आणि इनोव्हा कार यांची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात 10 जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी म्हैसूर जिल्ह्यातील कोळ्ळेगाल-टी. नरसीपूर मार्गावर कुरुबूरनजीक घडला. अपघातात संपूर्ण इनोव्हा कारचा चक्काचूर झाला तर बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. जखमींना नजीकच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये चार पुरुष, तीन महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. मृत बळ्ळारी जिल्ह्याच्या संगनकल येथील रहिवासी आहेत. ते27 मे रोजी संगनकल येथून पर्यटनासाठी म्हैसूरला आले होते. दुपारी चामुंडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन चामराजनगरमधील बिळगिरी रंगनबेट्ट येथे निघाले होते. जात असताना या पर्यटकांवर सोमवारी काळाने झडप घातली.