कोल्हापूर: पाण्याच्या कनेक्शन साठी रस्ता खुदाई परवानगी देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता लाच लुचपतच्या जाळ्यात अडकला. राजेंद्र हुजरे असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी रंकाळा स्टँड परिसरातील एक बेकारी शेजारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, हुंजरे यांच्या सदाशिव दिंडे नगर येथे घरावर छापा टाकण्यात आला. या घराच्या झडतीमधून आठ लाखाची रोकड मिळून आली. लाचलुचपत विभागाने ही रक्कम जप्त केली आहे.