नवी दिल्ली :
आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने (बीपी)10 हजार 644 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेला बदल आणि मार्जिनमध्ये झालेली वाढ यामुळे बीपीसीएलला नफा प्राप्त करता आला आहे. पहिल्या तिमाहीत निव्वळ विक्री 1.12 ट्रिलीयन इतकी राहिली आहे. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 6 हजार 148 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता.