वृत्तसंस्था/ बर्लिन
97 वर्षीय वृद्ध महिला इर्मगार्ड यांना 10,505 हत्यांमध्ये सामील असल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. इर्मगार्ड फर्चनर या नाझी शिबिरात तैनात होत्या आणि हिटलरच्या टायपिस्ट म्हणून त्यांनी काम केले होते.
इर्मगार्ड फर्चनर नाझी सैन्यात माजी सचिव देखील राहिल्या आहेत. नाझी गुन्हय़ांसाठी दोषी ठरविण्यात आलेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. अटकेवेळी त्या स्टेंथॉफमध्ये होत्या. 1943-1945 पर्यंत त्यांनी टायपिस्ट म्हणून काम केले होते. इर्मगार्ड यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. नाझी सैन्यात त्या सैनिक म्हणून काम करत नव्हत्या. त्यांची सेवा एका असैन्य कर्मचाऱयाच्या स्वरुपात होती, परंतु इर्मगार्ड यांना कँपमध्ये काय चालले आहे याची पूर्ण कल्पना होती, याचमुळे या गुन्हय़ात देखील सामील होत्या असे न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटले आहे.
65 हजार लोकांची हत्या
स्टेंथॉफमध्ये सुमारे 65 हजार लोकांना अत्यंत क्रूरपणे मारले गेले होते, मारले गेलेल्यांमध्ये ज्यू कैदी, कैदेत असलेल्या सोव्हियत सैनिकांचा समावेश होता. फर्चनर यांना 10,505 लोकांच्या हत्येत मदत करणे आणि हत्येसाठी चिथावणी देणे तसेच अन्य 5 जणांच्या हत्येच्या प्रयत्नात सहभागी असल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.
गॅस चेंबरमध्ये हत्यासत्र
स्टेंथॉफ कँपमध्ये जून 1944 च्या आसपास 65 हजार लोकांना ठार करण्यात आले होते. स्टेंथॉप कँपमध्ये मारले गेलेल्या लोकांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर इर्मगार्डच मोहोर उमटवित होत्या. मृतांमध्ये काही बिगरज्यू कैदी होते तर काही सोव्हियत सैनिक होते. अटकेवेळी इर्मगार्ड 18-19 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावरील खटला एका विशेष ज्युवेनाइल कोर्टात चालला होता.
सप्टेंबर 2021 मध्ये सुनावणी
सप्टेंबर 2021 मध्ये सुनावणी झाल्यावर फर्चनर या रिटायरमेंट होममधून पळून गेल्या होतय. त्यानंतर त्या हॅम्बर्गच्या एका रस्त्यावर आढळून आल्या होत्या. जे काही घडले त्याबद्दल मला खेद आहे. त्या काळात मी स्टेंथॉफमध्ये असल्याचा खेद आहे असे फर्चनरने न्यायालयासमोर म्हटले होते. त्यांच्या विरोधातील खटला जर्मनीत नाझीयुगाच्या गुन्हय़ांमध्ये अखेरचा ठरू शकतो, परंतु काही प्रकरणांचा अद्याप तपास केला जात आहे.