आचार्य 108 प्रज्ञासागर मुनि महाराजांचे गौरवोद्गार
वार्ताहर/ कोगनोळी
कोगनोळी ही पावनभूमी असून येथे शांतीसागर महाराजांनी 1915 व 1920 साली चार्तुमास करून भूमीला पवित्रता प्राप्त करून दिलेली आहे. 108 शांतीसागर महाराज गुंफा ही पवित्रभूमी आहे. भविष्यकाळामध्ये ही भूमी एक पर्यटनस्थळ होण्यासाठी माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनी पुढाकार घ्यावा. आमच्याकडून त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य राहील, असे आशिर्वचन प्रज्ञासागर मुनि महाराज यांनी केले.
येथील जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आचार्य 108 प्रज्ञासागर मुनि महाराज यांचे कोगनोळीच्या प्रवेशद्वारावर स्वागत करण्यात आले. माजी मंत्री वीरकुमार पाटील व आशाराणी पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते मुनि महाराजांची पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी आचार्य 108 प्रज्ञासागर मुनि महाराजांनी शांतीसागर महाराज यांच्या पादुकांचे व गुंफाचे दर्शन घेतले.
यावेळी रावसाहेब चौगुले, पारीसा माणगावे, आण्णासाहेब सांगरोळे, राजतिलक पाटील, राजाराम चौगुले, महावीर करडे, प्रकाश पाटील, एल. डी. चौगुले, कुमार पाटील यांच्यासह जैनधर्मिय बांधव श्रावक-श्राविका मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.