दोन महिलांचा मफत्यू ; 14 जनावरे दगावली 400 जणांना सुरक्षित स्थळी हलविले
प्रतिनिधी/ नागपूर
मागील काही दिवसांपासून मान्सून दडी मारली होती, परंतु आता तो पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामध्ये शनिवारी रात्री 2 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नागपूर शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. हा पाऊस इतका मोठा झाला की, अवघ्या चार तासात 109 मिमी पाऊस झाल्यामुळे सकल भागात पावसाचे पाणी शिरले. उपराजधानी चारही दिशेने तुंबली. विविध ठिकाणी बचावकार्याद्वारे 400 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या घटनाक्रमात दोन महिलांचा दुर्देवी मफत्यू झाला असून 14 जनावरे दगावली आहेत.
प्रशासनाच्या सतर्कतेने एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली. नागपूर शहरात रस्त्यावर नावा दिसून आल्या पूरात अडकलेल्याना लगेच मदत करून जवानांनी सुरक्षित हलविले.
अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला सतत दोन तास विजांचा कडकडाटासह 4 तासात 109 मि.मी. पाऊस कोसळला. यातील पहिल्या 2 तासांमध्ये 90 मि.मी.पाऊस झाला. परिणामी शहरातील अंबाझरी तलावातील पाण्याचा ओव्हर फ्लो होवून हे पाणी नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले. अंबाझरी आणि वर्मा ले आऊट तसेच शंकरनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी वस्तीमध्ये शिरले.
प्रशासन सतर्क
या परिस्थितीचा सामना करण्याकरिता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने पावले उचलली. शहरात तत्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) आणि लष्करांचे प्रत्येकी दोन दल दाखल झाले व बचावकार्य सुरु झाले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी नागपुरसह जिल्हयातील शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. बचाव कार्यादरम्यान शंकरनगर भागातील मुक व कर्णबधिर शाळेच्या तसेच एलईडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
या सर्व घटनाक्रमात घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (70 वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (80 वर्षे) यांचा मृत्यू झाला. हजारी पहाड येथे पावसाने गोठ्यात पाणी शिरल्याने 15 जनावरांचा मृत्यू झाला. अनेक वाहने वाहून गेली. अनेक दुकांना मध्ये पाणी शिरल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे
शासनाने त्वरीत 25 हजारांची मदत करावी :
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सातत्याने लक्ष ठेवून असून देवेंद्र फडणवीस नागपूरला भेट देणार आहे. ज्यां नागरिकांची घरे वाहून गेले त्यांना शासनाने त्वरीत 25 हजार ऊपयांची मदत करावी अशी मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डटिवार यांनी केली.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी पहाटे 5 पासून प्रत्यक्ष घटनास्थळाला भेटी देऊन बचाव कार्याचे नियंत्रण केले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महानगर पालिका कार्यालयातील वार ऊममधून परिस्थितीचा आढावा घतला. हजारीपहाड (सह्याद्री) भागात या उभय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली.
या भागात गोठ्यात बांधलेली चौदा जनावरे (सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरे) मफत झाली आहेत. हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वर्हाडकर, राजेश वर्हाडकर आणि मफणाल घोघल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्याचे व आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.
नाशिक जिह्यातील सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु
नाशिक जिह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिह्यातील सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत नाशिक जिह्यातून मराठवाड्याकडे सुमारे एक लाख क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये दारणा धरणातून 96 हजार 107 , गंगापूर धरणातून 12 हजार 458, करवा धरणातून 9 हजार 908 भोजापुर धरणातून 416 आळंदी धरणातून 1 हजार 153 तर वालदेवी धरणातून 3 हजार 481 पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले आहे.