विद्यार्थी लागले तयारीला
बेळगाव : दहावीची अंतिम परीक्षा जसजशी जवळ येत आहे, तसतशी विद्यार्थ्यांमधून परीक्षेची तयारी जोरदार सुरू झाली आहे. मुख्य परीक्षेपूर्वी पूर्वपरीक्षा होणार असल्याने सध्या सर्वत्र एक्झाम फीवर दिसत आहे. दि. 23 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान पूर्वपरीक्षा होणार असून, विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला जात आहे.mय् ाावर्षी एसएसएलसी परीक्षा 31 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे परीक्षेच्या स्वरुपामध्ये बदल करण्यात आला होता. परंतु यावर्षी पूर्वीच्याच पॅटर्नने परीक्षा घेतल्या जाणार आहेत. जानेवारी अखेरपर्यंत सर्व शाळांनी अभ्यासक्रम शिकवून पूर्ण केला असून, फेब्रुवारी महिन्यापासून उजळणी घेतली जात आहे. शिक्षण विभागाने नुकतेच हॉलतिकीट पाठवून दिले असून शाळा प्रशासनांना ते डाऊनलोड करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार हॉलतिकीट डाऊनलोड करून त्यातील माहिती अचूक आहे का, हे तपासण्यात आले असून, पुढील दोन दिवसांत अचूक माहिती पुन्हा परीक्षा मंडळाला द्यावी लागणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये हॉलतिकिटांमध्ये माहिती तपासण्याचे काम सुरू आहे.