मुंबई
देशातील सर्वात मोठे बंदर हाताळणारी खासगी कंपनी अदानी पोर्टस् आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन यांनी आपला तिमाही निकाल जाहीर केला असून नफ्यात वर्षाच्या स्तरावर 5 टक्के वाढ नोंदवली असल्याचे समजते. 31 मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 1,159 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला असून याच अवधीत 5,797 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने 4,141 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.