भारतात आता अनेक प्रकारची चॉकलेट्स आढळून येतात. परंतु यातील काही चॉकलेट्स खरेदी करण्यासाठी मोठं काळीज असणे आवश्यक आहे. ला मॅडेलिन ऑ ट्रुफे नावाचे चॉकलेट सर्वात महाग मानले जाते. हे चॉकलेट निप्शचिल्ट नावाची कंपनी तयार करते. हे चॉकलेट केवळ ऑर्डर मिळाल्यावरच तयार करण्यात येते. ऑर्डर केल्यावर 14 दिवसांनी याची डिलिव्हरी केली जाते. या चॉकलेटचा एक बॉक्स 20 हजार रुपयांमध्ये मिळतो. हे चॉकलेट दुर्लभ मशरुमद्वारे तयार करण्यात येते, ज्याची किंमत 80-84 हजार रुपये प्रतिकिलो इतकी असते. याचमुळे हे चॉकलेट अत्यंत महाग आहे.
महागड्या चॉकलेटच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर डेलाफेज गोल्ड क्रमांकावर आहे. हे चॉकलेट स्विस गोल्ड कॉइनसोबत मिळते. एका बॉक्समध्ये 8 चॉकलेट्स मिळतात, जी 24 कॅरेट खाण्यायोग्य सोन्याद्वारे तयार केलेली असतात. याचबरोबर त्यांच्यासोबत एक अँटीक गोल्ड कॉइन देण्यात येते. याची किंमत 33 हजार रुपये इतकी असून हे चॉकलेट चांदीत देखील उपलब्ध आहे.
डेब्युवे अँड गॅल्लायस ले लिवरे हे जगातील सर्वात महागड्या चॉकलेट्समध्ये सामील आहे. हे एक फ्रेंच चॉकलेट असून ते सोन्याने आच्छादित बॉक्समध्ये पॅक करण्यात येते. याच्या आत 35 चॉकलेट्स असतात, जी हाताने तयार केलेली असतात. याच्या एका बॉक्सची किंमत 46 हजार रुपये आहे. याचा एक छोटा बॉक्स देखील मिळतो, ज्यात 12 चॉकलेटस असतात आणि तो 28 हजार रुपयांमध्ये मिळतो.
स्वारोवस्की स्टु• चॉकलेट हे लेबनीज चॉकलेट असून ते एका बॉक्समध्ये पॅक करण्यात येते. प्रत्येक बॉक्समध्ये 49 चॉकलेटस असतात, याला गोल्ड आणि प्लॅटिनमसोबत पॅक करण्यात येते. याच्या बॉक्समध्ये ज्या रेशीमचा वापर होतो, ते भारत आणि चीनमधून मागविण्यात येते. चॉकलेटच्या बॉक्सची किंमत 8 लाख 33 हजार रुपये आहे.
द गोल्डन स्पेकल्ड एग हे चॉकलेट जगातील 7 प्रसिद्ध चॉकलेट निर्मात्यांनी तयार केले आहे. याची किंमत सुमारे 9 लाख रुपये आहे. हे चॉकलेट लिलावात उपलब्ध करण्यात आले होते. व्हेनेझुएलामधून मागविण्यात आलेल्या विशेष कोकोद्वारे हे चॉकलेट तयार करण्यात आले आहे. तसेच ते अत्यंत महाग अन् दुर्लभ गोष्टींनी सजविण्यात येते.
टो’क चोकोलेट याचाही महागड्या चॉकलेटसमध्ये समावेश होते. हे चॉकलेट 50 ग्रॅमच्या एका बारमध्ये उपलब्ध होते. प्रत्येक बारची किंमत 22 हजार रुपये आहे. जगात या चॉकलेटचे केवळ 574 बारच उपलब्ध आहेत. हे चॉकलेट ऊसाचा रस आणि कोको पावडरद्वारे तयार करण्यात येते. हे चॉकलेट हाताने तयार करण्यात येत असल्याने याची किंमत अधिक आहे.
फोर्ब्सने नोकाज व्हिंटेज कलेक्शनला जगातील सर्वात महागडे चॉकलेट घोषित केले होते. याच्या एका बॉक्सची किंमत 71 हजार रुपये आहे. या चॉकलेटमध्ये 75 टक्के शुद्ध कोको आणि साखर तसेच बटरचा वापर करण्यात येतो. याचा बॉक्स स्टेनलेस स्टीलद्वारे तयार करण्यात येतो.
फर्रोझेन हॉन्टे चॉकलेट हे सेरेनडिपिटी 3 नावाच्या रेस्टॉरंटने स्वत:च्या डेजर्ट लिस्टमध्ये सामील करून जागतिक विक्रम केला आहे. हे जगातील सर्वात महागडे चॉकलेट डेजर्ट आहे. हे डेजर्ट अनेक प्रकारच्या कोको पावडर आणि दूधाच्या मिश्रणाद्वारे तयार करण्यात येते. यात सोने आणि हिऱ्याचाही वापर करण्यात येतो. हे डेजर्ट खाण्यासाठी सोन्याचा चमचा देण्यात येतो. या डिशची किंमत 21 लाख रुपये आहे.
ले चोकोलॅट बॉक्स सर्वात महागडे चॉकलेट आहे. याच्या एका बॉक्सची किंमत 12 कोटी 50 लाख रुपये इतकी आहे. या बॉक्समध्ये ग्राहकाला चॉकलेटसोबत नेकलेस, इयरिंग्स, अंगठी आणि ब्रेसलेट देखील मिळते. हे सर्व दागिने हिरे अन् अमूल्य रत्नांनी तयार केलेले असतात. 12 कोटीचे हे चॉकलेट खरेदी करण्यापूर्वी अब्जाधीशांनाही हजारवेळा विचार करावा लागणार आहे.