न्हावेली / वार्ताहर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वेत्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला . तर वेत्ये गावातील संतोषी गावकर व नुतन कोकुळकर या कर्तबगार महिलांचा पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला .यावेळी सरपंच गुणाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य भगवान गावडे, राजेंद्र आंबेकर, महेश गावडे, तन्वी गावकर, नंदिनी निगुडकर, रमेश गावकर, ग्रामस्थ गुरुदास गावकर, संतोष गावडे, शरद जाधव, सत्यवान गावडे, सुशिल कोकुळकर, मनोज पाटकर, हरिचंद्र गावकर, आनंद नाईक, सुरेश धारगळकर, एकनाथ गावडे , शंकर गावकर, संजय गावकर, रमेश जाधव ,तसेच बचतगट महिला उपस्थित होते. यावेळी वेत्ये ग्रामसेवक राजेश परब यांची बदलीनिमित्त निरोप समारंभ आयोजित करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .