जिल्हा नियोजन विभागाकडून तरतुद
जिह्यातील लक्ष्मी विलास पॅलेस, भुदरगड किल्ल्यासह 7 ऐतिहासिक वास्तूंचा समावेश
कोल्हापूर/ प्रवीण देसाई
जिह्यातील गडकिल्ले, मंदीरे व महत्वाची संरक्षित स्मारके यांच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 13 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मी विलास पॅलेस, भुदरगड किल्ल्यासह 7 ऐतिहासिक वास्तूंचा राज्य संरक्षित स्मारक म्हणून समावेश करण्यात आला आहे. या वास्तूंचा पुरातत्व विभागाकडून सर्व्हे सुऊ करण्यात आला आहे. तो पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.
संरक्षित स्मारकांचे संवर्धन करण्यासाठी सरकारकडून उपलब्ध होणारा निधी तुटपुंजा आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्याच्या एकूण निधीपैकी 3 टक्के निधी हा स्मारक संवर्धनासाठी खर्च करावा, असे निर्देश राज्य सरकारने जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिह्याचा नियोजन समितीचा वार्षिक आराखडा हा 480 कोटींचा आहे. त्यातील 3 टक्के प्रमाणे 13 कोटी ऊपये निधी हा स्मारक संवर्धनासाठी खर्च करण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 पासून पुढील तीन वर्षासाठी एकूण निधीच्या 3 टक्के निधीची तरतुद केली आहे.
संरक्षित स्मारकांमध्ये कोल्हापूर जिह्यातेल 7 स्मारकांचा समावेश आहे. त्यांच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून 13 कोटी ऊपये निधीची तरतुद करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव पुरातत्व विभागाकडून तयार केला जाणार आहे. त्यानंतर त्याला तांत्रिक मान्यता देऊन निधी मागणीसाठी जिल्हाधिकार्यांना सादर केला जाईल. अशी एकंदरीत प्रक्रीया असणार आहे. तत्पूर्वी पुरातत्व विभागाकडून या संरक्षित स्मारकांचा सर्व्हे सुऊ करण्यात आला आहे. यामध्ये या स्मारकांच्या संवर्धनासाठी किती निधी लागेल? हे समजणार आहे. हा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. जिल्हाधिकार्यांकडून पुरातत्व विभागाच्या निधी मागणीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर जिल्हा नियोजन विभागाकडून निधीचे वितरण होणार आहे.
या ऐतिहासिक वास्तूंचे होणार संवर्धन
लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा), भुदरगड किल्ला-पेठ शिवापूर (ता. भुदरगड), रांगणा किल्ला-चिक्केवाडी (ता. भुदरगड), विशाळगड किल्ला (ता. शाहुवाडी), रामचंद्रपंत अमात्य समाधी (पन्हाळा), पांडवदरा लेणी-दळवेवाडी (ता. पन्हाळा), महादेव मंदीर (आरे, ता. करवीर) या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन होणार आहे.
राज्य सरकारने गडकिल्ले, मंदीरे व संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतुद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिह्यातील 7 ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी 13 कोटी ऊपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे.
-विजय पवार, जिल्हा नियोजन अधिकारी, कोल्हापूर.