स्मार्ट वीज मीटर जोडणीचे मिळणार काम : महाराष्ट्राकडून कंत्राट
वृत्तसंस्था / मुंबई
महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाकडून अदानी समूहाला 13,888 कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. या कंत्राटाअंतर्गत अदानी समूहाला आगामी काळामध्ये स्मार्ट वीजमीटरच्या जोडणीचे काम करावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (एमएसइडीसीएल) एकंदर सहा कामाची कंत्राटे वितरित करण्यात आली असून यापैकी दोन कामाची कंत्राटे अदानी समूहाला प्राप्त झाली आहेत. याअंतर्गत 13 हजार 888 कोटी रुपयांची कामे समूहाला करावयाची आहेत.
कोठे करणार वीज मीटर जोडणी
नव्या कंत्राटाअंतर्गत भांडुप, कल्याण आणि कोकण या भागामध्ये वीज मीटर जोडणी होणार आहे.