यमकनमर्डी पोलिसांची कारवाई
बेळगाव : बेकायदा चंदन विक्री करताना तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 14 किलो 660 ग्रॅम चंदन जप्त करण्यात आले आहे. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ, उपनिरीक्षक यमनाप्पा मांग, साहाय्यक उपनिरीक्षक एस. पी. मुरगोड, एस. एच. हादिमनी, वाय. डी. गुंजगी, बी. के. नगारी, आर. एस. पाटील, एम. एम. तळकटनाळ आदींनी पाच्छापूरजवळ ही कारवाई केली आहे. विठ्ठल बसवाणेप्पा तिगडी, लक्ष्मण शंकर डब्बगोळ दोघेही राहणार खणगाव, ता. गोकाक, महांतेश यल्लाप्पा नाईक, रा. बन्नीबागी, ता. हुक्केरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विठ्ठल व लक्ष्मण या दोघा जणांनी महांतेशला हा साठा विक्रीसाठी दिला होता. केए 49 ईए 3519 क्रमांकाच्या हिरो स्प्लेंडर मोटारसायकलवरून त्याच्या विक्रीसाठी पोहोचले असता पोलिसांनी त्यांना अटक केली. या त्रिकुटाविरुद्ध यमकनमर्डी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.