पाच जण बेपत्ता
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या सिचुआन प्रांतात रविवारी झालेल्या भूस्खलनात 14 जणांचा मृत्यू झाला. तसेच पाच जण अजूनही बेपत्ता आहेत. या भागात काही दिवसांपासून पाऊस पडत होता. पावसामुळे भूस्खलनाची दुर्घटना घडली आहे. यापूर्वीही येथे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. ही दुर्घटना अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे बचाव पथक आणि स्थानिक प्रशासनाला माहिती मिळण्यास वेळ लागला. सध्या 180 बचाव कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच पाऊस सुरू असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.