व्हॅटिकनमध्ये ईस्टरच्या प्रार्थनेवेळी लोकांच्या उपस्थितीवर बंदी : थेट प्रक्षेपण होणार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लागण नाही
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
क़ोरोना विषाणूचे रविवारी सकाळपर्यंत जगभरात एकूण 1 लाख 56 हजार 932 रुग्ण आढळून आले आहेत. तर 5839 जणांचा बळी या विषाणूने घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आले होते, परंतु चाचणीनंतर ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या पत्नी डोना यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्पेनमध्ये काही अपवाद वगळता टाळेबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.