ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. कोरोनातून सावरत असताना देशाला आरोग्य क्षेत्रात भरीव तरतुदीची अपेक्षा आहे. त्यानुसार देशात 157 नवीन नर्सिंग काँलेज उभारण्यात येणार असल्याचे सीतारामण यांनी सांगितले.
सीतारामण यासंदर्भात घोषणा करताना म्हणाल्या, 2014 नंतर स्थापन झालेल्या विद्यमान 157 नवीन मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने 157 नवीन नर्सिंग कॉलेज उभारली जातील. पीएमपीबीटीजी डेव्हलपमेंट मिशन विशेषत: आदिवासी गटांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही नर्सिंग कॉलेज सुरू केली जातील. जेणेकरून पीबीटीजी वसाहती मूलभूत सुविधांनी सुसज्ज होऊ शकतील. पुढील 3 वर्षांत ही योजना लागू करण्यासाठी 15,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
अधिक वाचा : 81 लाख महिला बचतगटांचे होणार सबलीकरण