प्रतिनिधी / बेळगाव : जगन्नाथ ( उर्फ ) नानाशंकर शेठ यांची 157 वी पुण्यतिथी आज साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात नानांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. नाना शंकर शेठ मार्ग संयुक्त महाराष्ट्र चौक, बेळगाव येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनायक कारेकर, प्रमुख पाहुणे, जायंट्स क्लबचे माजी अध्यक्ष मदन बामणे, समाजातील सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.