वृत्तसंस्था /काबूल
अफगाणिस्तानच्या बदखशान भागात गुऊवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 16 जण ठार झाले. येथे नायब राज्यपालांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी गर्दी झालेली असतानाच हा स्फोट घडविण्यात आला. कार्यक्रमावेळी घटनास्थळी शेकडो लोक उपस्थित असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. बदखशान राज्याची राजधानी फैजाबादमध्ये ही घटना घडली. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या खोरासान गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. प्राथमिक माहितीनुसार 16 जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच जखमी लोकांचा आकडा 50 च्या पुढे असून बरेचजण गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले.