सायबेरियातील सर्वात थंड ठिकाण
रशियात मध्य सायबेरियातील तोर्गाशिंस्कीला जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक मानले जाते. हे ठिकाण अलिकडेच पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. क्रास्नोयार्स्क क्रायमध्ये तोर्गाशिंस्की पर्वतरांगेच्या शिखरापर्यंत पायी पोहोचता यावे याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. 1.2 किलोमीटर लांबीच्या मार्गात 1,683 पायऱया आहेत. रशियातील सर्वाधिक पायऱया असलेले हे ठिकाण आहे. शिडीची मोठी लांबी आणि अधिक उंचीपर्यंत जात असल्याने याला ‘स्वर्गाची शिडी’ देखील म्हटले जाते. या शिडीद्वारे सर्वात उंच ठिकाणी पोहोचल्यावर मनमोहक दृश्य दिसून येते.
हा मार्ग सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुला राहतो. न थांबता हा प्रवास पूर्ण करण्यास 40 मिनिटे लागतात. या नव्या मार्गाची निर्मिती उन्हाळय़ात सुरू झाली आहे. हा मार्ग पूर्ण झाल्याने स्टॉल्बी नेचर रिझर्व्ह आणि तोर्गाशिंस्की रिज परस्परांसोबत जोडले गेले आहेत.
चहुबाजूने हिमाच्छादित पर्वतांनी घेरलेले असल्याने हा प्रवास अत्यंत सुंदर वाटतो. रात्रीच्या काळोखात उजळून निघणाऱया दिव्यांनी याचे सौंदर्य अधिकच वाढते. हे रशियातील सर्वात लांब शिडी असलेले स्थळ देखील आहे. 131 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात फैलावलेला सायबेरियाचा भाग 1991 पर्यंत सोव्हियत संघाचा हिस्सा असायचा. सायबेरियाचे हवामान अत्यंत प्रतिकूल असल्याने येथे अत्यंत विरळ लोकवस्ती आहे.