10 लाख ऊपयांचा दंड होणार वसूल, : चालकांच्या मोबाईलवर, घरी येणार चलन
पणजी : राजधानी पणजी आणि सभोवतालच्या परिसरात म्हणजे मेरशी जंक्शन ते पर्वरीपर्यंत बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही पॅमेरा प्रणालीतून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत सुमारे 1717 चलन्स देण्यात आली असून ती वाहनचालकांचे मोबाईल किंवा घरच्या पत्त्यावर पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या चलनातून एकूण ऊ. 10 लाखाची रक्कम दंडात्मक कारवाईतून मिळण्याची अपेक्षा सूत्रांनी वर्तवली आहे. गेल्या 1 जूनपासून सदर प्रणाली कार्यरत करण्यात आली असून पहिल्याच दिवशी 400 पेक्षा अधिक वाहनचालकांना चलने पाठविण्यात आली होती. त्यानंतर 6 दिवसात मिळून सुमारे 1717 वाहनचालकांनी वाहतूक नियम मोडल्याची नोंद त्या प्रणालीत झाली असून त्या सर्वांना चलने देण्यात आली आहेत.
दरदिवशी 300 चालक मोडतात नियम
उपरोक्त सहा दिवसांचा वाहतूक नियम भंगाचा तपशील पाहिल्यास प्रतिदिन सरासरी 250 ते 300 चालक वाहतूक नियम मोडतात असे समोर आले आहे. या पॅमेरा प्रणालीबाबत अद्यापही जनजागृती झालेली नाही किंवा ती आणखी होण्याची गरज दिसून येत आहे.
पर्यटकांना चलन पाठविण्याची व्यवस्था नाही
गोव्याबाहेरील वाहनचालकांना सदर प्रणालीची माहिती नसल्याने ते वाहनचालक पॅमेऱ्याच्या सापळ्dयात सापडत असले तरी त्यांचे वाहन नोंदणी गोव्याबाहेरील राज्यात असल्याचे त्यांना चलन पाठविणे शक्य होत नाही, असे सूत्रांनी सांगितले. अतिवेग, सिग्नल तोडणे, हेल्मेट नसणे व इतर नियमांचे उल्लंघन या कारणांसाठी चलने देण्यात आली आहेत. वेगाने वाहने नेली म्हणून 907 चलने देण्यात आली असून त्यातून ऊ. 83 हजार मिळणार आहे. सिग्नल तोडले म्हणून 1140 प्रकरणे नोंद झाली असून त्यातून ऊ. 5.72 लाख प्राप्त होणार आहेत. सदर 10 लाख रक्कमेतील ऊ. 7 लाख प्रणाली राबविणाऱ्या कंपनीस मिळणार असून ऊ. 3 लाख सरकारी तिजोरीत जाणार आहेत.