ऑनलाईन टीम / नाशिक :
1993 साली मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमन याचा नाशिकमधील जेलमध्ये मृत्यू झाला. तो 2018 पासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. हृदय विकाराच्या झटक्याने युसूफ मेमनचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. युसूफ मेमन हा टायगर मेमनचा भाऊ होता.
1992-93 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या बॉम्बस्फोटात सुमारे 800 जणांना मृत्यू झाला होता. तर काही हजार नागरिक जखमी झाले होते. याबॉम्बस्फोटाचा सूत्रधार हा टायगर मेमन होता. मेमन हा माहीम येथे राहत होता. त्याच्या घरात शक्तीशाली बॉम्ब बनवण्यात आले होते. यामुळे या खटल्यात टायगर मेमन याचं अख्ख कुटुंब हे आरोपी होते.
दरम्यान, युसूफच्या मृतदेहाचे शवविच्छेदन धुळे येथील शासकीय महाविद्यालयात केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कारागृह अधिक्षकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी कारागृहात युसूफला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तात्काळ पोलीस वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारादरम्यान युसूफला डॉक्टरांनी मयत घोषित केले. हृदय विकाराच्या झटक्याने यूसूफचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे.