2019-20 मध्ये आरबीआयच्या वार्षिक अहवालातून माहिती
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने(आरबीआय) 2019-20मध्ये 2 हजार रुपयांची नवीन नोट छापलेली नाही. याच दरम्यान दोन हजारच्या नोटांचा वापर कमी झाला असल्याची माहिती आपल्या वार्षिक अहवालामधून दिली आहे.
मार्च 2018 च्या अंतिमपर्यंत उपलब्ध चलनापैकी दोन हजारच्या नोटेची संख्या ही 33,632 लाख इतकी राहिली होती. जी मार्च 2019 च्या अंतापर्यंत घटून 32,910 लाखवर आली आहे. तर हीच आकडेवारी मार्च 2020 च्या अंतिम दिवसापर्यंत घटत जात 27,398 लाखावर राहिली आहे.
एकूण चलनामध्ये 2 हजारच्या नोटेचा हिस्सा हा मार्च 2020 पर्यंत घटत जात 2.4 टक्के राहिला आहे. हा टक्का मार्च 2019 मध्ये 3 टक्के तर 2018 च्या मार्चपर्यंत 3.3 टक्के होता. परंतु मार्च 2020 पर्यंत चलनामधील सध्याच्या एकूण नोटाच्या मूल्यामध्ये 2,000 च्या नोटेचा हिस्सा हा घटून 22.6 टक्क्मयावर राहिला होता.
2018 नंतरच्या तीन वर्षाच्या काळात 500 आणि 200 रुपये नोटांच्या वापरात वेगाने वाढ झाली आहे. मूल्य आणि संख्या या दोन्हीच्या हिशोबात 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचा पुरवठा वाढत गेला आहे. 2019-20 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटेच्या छपाईसाठी कोणत्याही प्रकारची ऑर्डर देण्यात आली नसल्याची माहिती अहवालातून दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक चलन मुद्रण प्रायव्हेट लि. तसेच सिक्मयुरिटी प्रिटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून कोणत्याही प्रकारे दोन हजारच्या नोटेचा पुरवठा करण्यात आलेला नसल्याचे आरबीआयच्या अहवालात स्पष्ट केले आहे.