दोघा संशयितांना अटक , सोनाराच्या साथीने इतरांच्या नावे बनावट सोने ठेवले गहाण
प्रतिनिधी/ पणजी
युको बँकेला 2 कोटी 63 लाख 7 हजार 280 रुपयांचा गंडा घालणाऱया दोन संशयितांना आर्थिक गुन्हा विभागाने अटक केली आहे. संशयितांच्या विरोधात भादंसं 406, 409, 420, 120 (बी) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयितांची नावे हेमंत रायकर (54, कोलवा) व गुंडू कोलवेकर (43, कुडतरी) अशी आहेत. दोन्ही संशयितांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
संशयित गुंडू कोलवेकर याने वेर्णा, फार्तोडा व मडगाव येथील राष्ट्रीयकृत युको बँकेच्या शाखेत अनेकांच्या नावे सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. हा व्यवहार 12 जुलै 2019 ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत झाला होता. कर्जातून मिळालेले पैसे त्याने स्वतःसाठी उपयोग केले होते. कर्जदार कर्जाचे हप्ते भरीत नसल्याने बँकेने सोन्याचा लिलाव करण्याचे ठरविले तेव्हा सोने बनावट असल्याचे कळले. तेव्हा बँकेचे मुख्य व्यवस्थापक ज्ञाननंद शर्मा यांनी आर्थिक गुन्हा विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून संशयितांना अटक केली. संशयित हेमंत रायकर हे पेशाने सोनार असून त्याने कर्जासाठी बँकेत तारण ठेवलेले सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे या प्रकरणात संशयित हेमंत रायकर याचाही हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांनी मिळून युको बँकेला 2 कोटी 63 लाख 7 हजार 280 रुपयांचा गंडा घातल्याचा `ठपका “`ठेऊन “दोघांनाही “अटक “करण्यात “आली “““आहे“. “