प्रतिनिधी / ओरोस
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गिरीश सदाशिव नलावडे वय 23 राहणार पडवे तालुका कुडाळ याला जिल्हा विशेष न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी २० वर्षे सश्रम कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सहकारी वकील संदीप राणे आणि अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. 2019 ते 2021 या कालावधीत हा गुन्हा घडला होता. 20 फेब्रुवारी 2021 रोजी सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल झाली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.