पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने जेष्ठ नागरिकांसाठी मोफत एस टी पास सुविधेला मुदत वाढ दिल्याने व परिसरातील जेष्ठ नागरिकांच्या आग्रहास्तव पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन च्या वतीने जेष्ठ नागरिकांना एस.टी.पास काढून देण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या जेष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या पास सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी उन्नति सोशल फाऊंडेशन च्या अध्यक्षा कुंदा भिसे , विकास काटे , रमेश वाणी , ए.ए.नाईकवाडी जयपाल सिदनाळे , विनोद भल्ला ,दिलीप देशमुख ,दिलीप दोंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पिंपळे सौदागर मधील जेष्ठ नागरिकांना वर्षाला 4000 कि.मी. पर्यंतचा प्रवास अर्धे प्रवास शुल्क देऊन करता येणार आहे. ‘वाढत्या महागाईमुळे कामावरून निवृत्त झालेल्या लोकांसाठी जेष्ठ नागरिकांसाठी असे उपक्रम घेतले जातील ज्यामुळे नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल असे मत उन्नति सोशल फाऊंडेशन संस्थापक संजय भिसे यांनी व्यक्त केले’.
या उपक्रमाअंतर्गत पिंपळे सौदागर मधील एकूण 200 जेष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठाई वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी केले तर आभार विजय न्यायाधीश यांनी मानले