वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या सहाव्या युवा कबड्डी मालिकेला मदुराईतील फातिमा कॉलेज इनडोअर स्टेडियममध्ये येत्या रविवारपासून प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धा 24 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल.
2022 च्या युवा कबड्डी मालिकेला संपूर्ण देशातुन अपेक्षापेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमध्ये देशातील अनेक अव्वल कबड्डीपटू सहभागी होत आहेत. नुकत्याच झालेल्या कनिष्ठांच्या विश्वचषक स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणाऱ्या भारतीय संघातील 12 पैकी 8 कबड्डीपटू या स्पर्धेत विविध संघांकडून खेळणार आहेत. अरवली अॅराज, हिमालयन तेहर्स, सिंध सोनिक्स, कझीरंगा रिनोज, हम्पी हिरोज, चंबल चॅलेंजर्स, मयुरा मॅवेरिक्स, पंचला प्राईड, ताडोबा टायगर्स, मराठा मार्वल्स, विद्यमान विजेता पलानी टस्कर्स, पेरियार पँथर्स, चोला विरेन्स आदी संघ सहभागी होणार आहेत