ऑस्ट्रियात जमिनीत अनेक फूट खोल असलेल्या मिठाच्या खाणीत पुरातत्व तज्ञांना एक प्राचीन बूट सापडला आहे. हा बूट हजारो वर्षे जुना असून तो एका मुलाचा होता. हा बूट सुमारे 2200 वर्षे जुना असल्याचे पुरातत्वतज्ञांनी सांगितले आहे. या बूटकडे पाहिल्यावर मुलांनी या खाणीत काम केलेले असावे असे वाटते. फेकण्यात आलेल्या दगडांना फावड्याने हटविण्याचे काम लहान मुले करत असावीत. तसेच लहान मुले बहुमूल्य सामग्री पृष्ठभागावर नेत असण्याचीही शक्यता आहे.
खाणीत काम करणाऱ्या लोकांकडून सोडण्यात आलेला हा एकमेव पुरावा अत्यंत जुना असल्याने याच्याद्वारे महत्त्वाची माहिती मिळविता येणार आहे. जर्मनी मायनिंग म्युझियमने यासंबंधीची माहिती दिली आहे. ऑस्ट्रियाच्या डर्नबर्गमध्ये लोहयुगीन मिठाच्या खाणीत एका भुयारासाठी खोदकाम सुरू असताना पुरातत्वतज्ञांना हा बूट सापडला आहे. लोहयुग ख्रिस्तपूर्व 800 सालापासून ख्रिस्तपूर्व पहिल्या सालापर्यंत हेते. हा बूट 5-6 वर्षीय मुलाचा असावा असा अनुमान पुरातत्वतज्ञांनी व्यक्त केला आहे. लोहयुगापासूनच खाण कामगार साल्जबर्गनजीक ड्यूरनबर्ग गावात खाणकाम करत राहिले आहेत. पुरातत्व तज्ञांनी उत्तम तयार करण्यात आलेल्या या बूटाला संरक्षित केले आहे. हा बूट अत्यंत लहान दिसत असला तरीही त्याला अविश्वसनीय पद्धतीने संरक्षित करण्यात आले होते. करड्या रंगाचा हा बूट यु आकाराच्या हुकांसोबत खुला आहे. कार्बनिक सामग्री सर्वसाधारणपणे कालौघात नष्ट होते, परंतु या बूटासोबत असे घडलेले नाही असे पुरातत्वतज्ञांनी सांगितले आहे. बूटात अद्याप सन किंवा लिननच्या लेसचे अवशेष होते. याच्या लेस-अप पॅटर्न आणि डिझाइनच्या आधारावर पुरातत्वतज्ञांनी हा बूट ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील असावा असे म्हटले. बूट आधुनिक युरोपीय आकाराच्या 30 नंबरच्या बूटशी साधर्म्य साधणारा असल्याचे म्हटले आहे. तर अमेरिकेच्या साइजनुसार हा 11-12 वर्षीय मुलाचा असू शकतो.