ही घटना अमेरिकेतील आहे. वॉशिंग्टन येथील एका डोळय़ाच्या रुग्णालयात एका महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या डोळय़ातून तब्बल 23 कॉन्टॅक्ट लेन्सिस बाहेर काढण्यात आल्या. अशाप्रकारची ही जगातील पहिलीच शस्त्रक्रिया मानली जात आहे. या शस्त्रक्रियेचा व्हिडिओही लोकप्रिय झाला असून 20 लाख लोकांनी आतापर्यंत तो पाहिला आहे. ही शस्त्रक्रिया डॉ. कॅथरिना कुर्तिवा यांनी केली. त्यांनीच या शस्त्रक्रियेचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.
सदर महिला रात्री झोपताना आपल्या डोळय़ातून कॉन्टॅक्ट लेन्स काढून ठेवण्याचे विसरत असे. दुसऱया दिवशी सकाळी उठल्यानंतर ती नवी कॉन्टॅक्ट लेन्स घालत असे. हा प्रकार सलग 23 दिवस चालला. पुढे तिच्या डोळय़ात दुखायला लागल्याने आणि दिसणे बंद झाल्यामुळे ती डॉक्टरकडे आली. तिच्या डोळय़ांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या बुब्बुळाच्या वरच्या भागात कॉन्टॅक्ट लेन्सेसचे थरच्या थर आढळून आले. ही शस्त्रक्रिया पूर्ण होण्यास तासभराहून अधिक वेळ लागला. डॉक्टरांनी कौशल्याने बटाटय़ाच्या सालीसारख्या पातळ असणाऱया 23 लेन्सिस एकापाठोपाठ एक बाहेर काढल्या. शस्त्रक्रियेसाठी ज्वेलर फोरसेप्स या वैद्यकीय उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 23 लेन्सेस डोळय़ात मावल्या कशा? हाही प्रश्न विचारला जात आहे. पण एकंदर घटना स्वारस्यपूर्ण आहे.