मदुराई / वृत्तसंस्था
तामिळनाडूमध्ये मदुराई येथे विविध गावांमध्ये रविवारी मट्टू पोंगलच्या दिवशी जल्लीकट्टूला सुरुवात झाली. यासोबतच जल्लीकट्टू दरम्यान 23 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 13 जणांना मदुराई येथील शासकीय राजाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जल्लीकट्टू हा खेळ पोंगल सणाचा एक भाग आहे. मदुराईतील अवनियापुरम येथे रविवारी जल्लीकट्टूचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात सहभागी होणाऱया लोकांसमोर बैलाला नियंत्रित करण्याचे आव्हान असते. बैल उधळल्यास त्याने केलेल्या मारहाणीत उपस्थितांना प्राण गमवावे लागण्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत.