आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती : येत्या अठरा महिन्यांत प्रकल्प होणार पूर्ण.क्रिटिकल केअर युनिटसाठी ऊ. 100 कोटी
विशेष प्रतिनिधी /पणजी
आसाममध्ये पंतप्रधानांच्या सहकार्याने निर्माण केलेल्या इस्पितळाच्या धर्तिवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात ऊ. 270 कोटी खर्च कऊन कर्करोग उपचार इस्पितळाची उभारणी करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष सचिव पी. के. मिश्रा यांनी त्यास मान्यता मिळवून दिली आहे. गोव्यात वाढत्या कर्करोग ऊग्णांसाठी गोव्यातच उपचार करण्यासाठी हे एक क्रांतिकारक पाऊल ठरणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
गोव्यात कर्करोग ऊग्णांची संख्या भयंकर वाढत आहे आणि त्यातून दगावणाऱ्यांची संख्याही वाढतेय. कर्करोगावर गोव्यात उपचार होतात. गोमेकॉमध्ये देखील उपचार होतात परंतु, काही महत्त्वाच्या व अत्याधुनिक पद्धतीच्या उपचारांसाठी मुंबई, बंगळूर, दिल्ली अशा दूर ठिकाणी जावे लागते. यामध्ये ऊग्णांबरोबरच त्यांचे नातेवाईक देखील खचून जातात. यावर उपाय म्हणून आपण अभ्यास केला, असे राणे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आशीर्वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा पातळीवर अत्याधुनिक उपाय अंतर्गत आसाममध्ये गुवाहाटी येथे कर्करोग इस्पितळ उभारण्यास आसाम सरकारला मदत केल्याचे आपल्या निदर्शनास आले. आपणही त्याचा सातत्याने पाठपुरावा केला आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांच्याशी संपर्क साधला. मागील भेटीत पंतप्रधानांनी आरोग्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शविली होती. त्यांच्या सूचनेनुसार आपण मिश्रा यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने या इस्पितळ उभारण्यास मदत दिली.
बांबोळीत गोमेकॉच्या सुपरस्पेशालिटी इस्पितळाच्या मागे कर्करोग इस्पितळ उभारले जात आहे. 18 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होईल. ऊ. 270 कोटी खर्च येत असून यातील 60 टक्के रक्कम केंद्राकडून तर 40 टक्के रक्कम गोवा सरकार खर्च करणार आहे. गोवा राज्य कर्करोग उपचार संस्था या नावाने हे इस्पितळ उभारले जाईल.
‘टाटां’चेही लाभले सहकार्य
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कर्करोगावर उपचारासाठी उभारण्यात येत असलेल्या इस्पितळासाठी टाटाचीही मदत घेतली आहे. ते म्हणाले की, कर्करोगावर अत्याधुनिक अशी सर्व यंत्रणा आम्ही गोव्यात बसवू. टाटा इस्पितळाने आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. केंद्र, गोवा आणि टाटा यांच्या दरम्यान समन्वय करारही झालेला असून कर्कऊग्णांना रोगमुक्त करण्याचा संकल्प आरोग्य खात्याने सोडलेला आहे. या नव्या समन्वय करारामुळे गोव्यातील ऊग्णांना फार मोठा दिलासा मिळून जाईल.
क्रिटिकल केअर युनिटसाठी 100 कोटी
गोमेकॉच्या आवारात आणखी दोन प्रकल्प उभारले जात असून त्यात अत्यंत गंभीर अशा ऊग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुऊ केला जात आहे. त्यावर ऊ. 100 कोटी खर्च केला जात आहे. उत्तर गोव्यात गोमेकॉच्या आवारात तर दक्षिण गोव्यात जिल्हा इस्पितळात हा विभाग सुऊ होईल. दोन्ही प्रकल्पांवर प्रत्येकी ऊ. 50 कोटी मिळून ऊ. 100 कोटी खर्च केले जाणार आहेत.
महिला व बालांसाठी 100 कोटींचा प्रकल्प
महिला व बालकांवर उपचारासाठी स्वतंत्र इस्पितळ इमारत गोमेकॉच्या आवारात उभारली जात आहे. त्यावर ऊ. 100 कोटी खर्च केले जातील. या प्रकल्पाला देखील केंद्राची मंजुरी लवकरच मिळेल, असे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.