माजी सरपंच निवडणूक रिंगणात,
प्रतिनिधी /सांखळी
डिचोली तालुक्मयातील सुर्ल ग्रामपंचायतीतून सात जागांसाठी 27 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. सिद्धेश्वर नगर, देउळवाडा, तारमाथा, भिले, जोशींभाट, खडप, भायलीफाळ, कडचाळ, बाराजण, खोडगीणे, डिंगणे, सकयलेंबाये, मडकईकरवाडा, भामईकरवाडा, वरचेबाये, गावकरवाडा, उमर्ये, घाडीवाडा, अगडये, घोडकातड या वाडय़ावरील मतदार मतदान करतील.
प्रभाग 1 मधून विश्रांती सुर्लकर, मनीषा सोननाईक, स्नेहा शिरोडकर, अर्चना नार्वेकर. प्रभाग 2 मधून सुभाष फोंडेकर, उदय नाटेकर, प्रकाश फोंडेकर, आनंद फोंडेकर, प्रदीप फोंडेकर. प्रभाग 3 मधून भोला खोडगीणकर, दीपक खोडगीणकर, प्रभाग 4 मधून वंजीता कालेकर, प्रियांका बायेकर, सानवी मडकईकर, सीमा गावडे, प्रभाग 5 मधून आपा भामईकर, दिनेश मडकईकर, प्रभाग 6 मधून प्रशांती घाडी, सुचिता गावकर, सूचिता घाडी, सृजना घाडी, प्रभाग 7 मधून पूर्णवी सुर्लकर, शाणू सुर्लकर, संतोष मावळीकर, प्रेमानंद घाडी या सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
माजी सरपंच निवडणूक रिंगणात
सांखळी सुर्ल पंचायतीचे माजी सरपंच सुभाष फोंडेकर, भोला खोडगीणकर, प्रेमानंद घाडी हे पंचायत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर मागील पंच महेंद्र शिरोडकर, प्रशांत गावकर यांनी आपल्या पत्नीला तर सुरेखा खेंडगीणकर यांनी आपल्या पतीला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. यंदाच्या पंचायत निवडणूक सर्वात सुर्ल गावात सर्वात कमी वयाची उमेदवार कु. पूर्णवी सुर्लकर ही आहे.