वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रातील कंपनी मायक्रोटेक डेव्हलपरने गेल्या तिमाहीमध्ये फ्लॅट विक्रीमधून जवळपास तिप्पट रक्कम प्राप्त केली असल्याची माहिती आहे. बांधकाम क्षेत्रात सध्याची ही कंपनीची उत्तम कामगिरी मानली जात आहे.
आर्थिक वर्ष 2022-23च्या पहिल्या तिमाहीमध्ये विक्रीच्या माध्यमातून 2814 कोटी रुपये कंपनीने प्राप्त केले आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता सदरच्या तिमाहीमध्ये 194 टक्के इतकी विक्रीत वाढ दर्शविली गेली आहे. नवीन वर्षाच्या स्तरावर पाहता सदरची विक्री ही तिप्पट नोंदली गेली आहे. सध्या बांधकाम क्षेत्र पूर्वपदावर असून रहिवासी घरांना वाढत्या मागणीचा हा परिणाम असल्याचे मायक्रोटेक डेव्हलपरने म्हटले आहे.
बेंगळूरुमध्येही प्रकल्प
मायक्रोटेक डेव्हलपर्स लोढा ब्रँडची कंपनी आहे. मुंबई मेट्रोपोलिटन रिजनसह पुणे शहरांमध्ये या कंपनीचे विविध प्रकल्प कार्यरत आहेत. हल्लीच कंपनीने बेंगळूरमध्ये आपले बांधकाम प्रकल्प सुरू केले आहेत.