ऑनलाईन टीम / तिरूअनंतपुरम :
सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमध्ये दुबईवरून आलेल्या एका व्यक्तीला 29 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही ह्या व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनाही धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती आणि त्याचा भाऊ दुबईतून आले होते, त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
दरम्यान त्यांच्या वडिलांना बारीक सारीक आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यात त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या संबधित व परिवारातील लोकांची चाचणी केली असता तीनजण कोरोनाबाधित आढळले होते.
मात्र, या कुटुंबातील एक व्यक्ती 29 दिवस आयसोलेशनमध्ये राहिला तरी कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.