सकाळची घटना ; जीवितहानी नाही
सावंतवाडी : प्रतिनिधी
मुंबई गोवा बायपास राष्ट्रीय महामार्गावर सकाळी नेमळे येथील पुलावर एअरपोर्टवर जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला मागून येणाऱ्या गाडीने धडक दिली . त्यामुळे नेमळे येथील पुलावर तीन कार मध्ये टक्कर झाली. विमानतळावर जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला मागून येणाऱ्या गाडीने ठोकर दिली. यात कोणती जीवितहानी झाली नसली तरी , एका मुलीच्या पायाला जखम झाली आहे.