शोपियांमध्ये चकमक ः सुरक्षा दलांकडून कारवाई सुरूच
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्य़ात मंगळवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. शोपियांच्या नागबल भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली होती. यादरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठार केले आहे. शोपियां जिल्हय़ातच काही दिवसांपूर्वी सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.