वाहतूक खात्याची कारवाई : 1410 अपघातात 130 ठार
पणजी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक खात्याने गेल्या 6 महिन्यांत 30851 जणांना दंड ठोठावला. मार्च ते ऑगस्ट या दरम्यान वाहतूक खात्याने हा दंड ठोठावला. गेल्या सहा महिन्यांत 1410 अपघात गोव्यात घडले. त्यातून 130 जणांनी प्राण गमाविले, तर शेकडोजण गंभीर जखमी झाले. वाहतूक खात्याने दिलेल्या माहितीनुसार, खात्याने वाहनचालक जे नियमभंग करीत आहेत, त्यांच्या विरोधात कडक पावले उचलली आहेत. राज्यात वाहतूक खात्यान जी नेंद झाली आहे, त्यानुसार दरमहा सरासरी 230 ते 235 अपघात होतात. गेल्या 6 महिन्यांत 130 जण मरण पावले. यातील जास्तीतजास्त हे दुचाकी वाहनांशी निगडीत अपघातांमध्ये मरण पावलेले आहेत. मार्च महिन्यात सर्वाधिक 30 जण मरण पावले. या महिन्यात 246 अपघात झाले. एप्रिलमध्ये 27 जण मरण पावले, तर 231 अपघात झाले. मे महिन्यात 19 जण मरण पावले आणि 261 अपघात झाले. जूनमध्ये 131 अपघात झाले व त्यात 171 जणांनी प्राण गमाविले. जुलैमध्ये 209 अपघात झाले व त्यात 24 जण मरण पावले. ऑगस्टमध्ये 232 अपघांतामध्ये 13 जण मरण पावले. वाहतूक खात्याने मार्चमध्ये 894 जणांना, एप्रिलमध्ये 619 जणांना, मे महिन्यात 737 जणांना, जूनमध्ये 11187 जणांना, जुलैमध्ये 7251 जणांना तर ऑगस्टमध्ये 10163 जणांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चलन पाठवून दंडात्मक कारवाई केली.