प्रतिनिधी / बेळगाव : रिंग रोड विरोधात 28 नोव्हेंबर रोजी आम्ही मोर्चा काढणार आहे. रिंग रोडसाठी 32 गावची जमीन घेतली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. त्यामुळे आम्ही मोर्चा काढणार असून आम्हाला सहकार्य करावे. अशा मागणीचे निवेदन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आले.
यावेळी माझी महापौर शिवाजी सुंटकर, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, अॅड. सुधीर चव्हाण यांच्यासह तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.