ShivaRajabhishek Day Ceremony : रायगडावर होणाऱ्या 350 व्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शिवभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यापासून याची तयारी सुरु असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. स्वराज्याची राजधानी विद्युत रोषणाईनं उजळली आहे.
शिवराज्याभिषेकासाठी विशेष तयारी
गडावर फसाड पध्दतीची आकर्षक रोषणाई
पर्यटकांसाठी कोंझर, वालसुरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
एकाच वेळी साडेतीन हजार वाहनं पार्क करता येणार आहेत.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गडावर 10 हजार लिटर पाणीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.
-गडाच्या पायथ्याशी 40 हजार लीटरचा पाणीसाठा आहे
शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 वैद्यकीय सेंटर्स तैनात करण्य़ात आली आहेत.
-गडावर 6, पायऱ्यांवर 6, पायथ्याशी 7 आणि वाहनतळावर वैद्यकीय सुविधा आहेत
-चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत.
-गडावर 109 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
-रायगड किल्ले परिसरात जवळपास 2 हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.