सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात असून यात एक व्यक्तीचा 37 वा विवाह झाल्याचा दावा करण्यात येत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे.
सद्यकाळात एकच विवाह जमविणे अवघड ठरले असताना आणि निर्माण झालेले नाते टिकविताना प्रचंड कसरत करावी लागत असताना एकाचवेळी 29 पत्नी सांभाळणाऱया व्यक्तीने 37 वा विवाह केला आहे. 2021 मध्ये 37 वा विवाह करणाऱया या व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘28 पत्नी, 135 मुले आणि 126 नातवंडांच्या उपस्थितीत या व्यक्तीने 37 वा विवाह केला आहे, अत्यंत शूर आहे हा व्यक्ती’ असे आयपीएस अधिकारी शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर करत नमूद केले होते. हा व्हिडिओ कुठे आणि कधी चित्रित करण्यात आला याची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकलेली नाही. या व्हिडिओत नववधू शांत असल्याचे दिसून येते. तर वृद्ध व्यक्तीचे कुटुंबीय उत्साहित दिसून आले आणि त्यांनी टाळय़ा वाजवून नववधूचे स्वागत केल्याचे व्हिडिओत आढळून येते.
या पूर्वी या व्यक्तीने 36 विवाह केले होते, या विवाहांमधून त्याला अनेक अपत्य आणि नातवंडं आहेत. सध्या त्याच्या 28 पत्नी हयात असून त्याच्यासोबत राहत आहेत. आता या व्यक्तीची 29 वी पत्नी घरात त्यांच्यासोबत राहू लागली आहे.