वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने सोमवारपासून बेंगळूरमध्ये सुरू होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण सराव शिबिरासाठी 39 हॉकीपटूंची निवड केली आहे.
बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये हे शिबिर घेतले जाणार असून ते 18 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या शिबिरात प्रशिक्षकांकडून भारतीय पुरुष हॉकीपटूंना बहुमोल मार्गदर्शन मिळणार असून या शिबिरासाठी निवडलेल्या हॉकीपटूंकडून कसून सराव करवून घेतला जाणार आहे. चीनमधील हेंगझोयु येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान आशियाई स्पर्धा होणार आहे. अलीकडेच भारतीय हॉकी संघाने चेन्नईत आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा सलामीचा सामना 24 सप्टेंबर रोजी उझ्बेकिस्थान बरोबर होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचा अ गटात समावेश करण्यात आला असून या गटात पाकिस्तान, जपान, बांगलादेश, सिंगापूर आणि उझ्बेक यांचा समावेश आहे.
संभाव्य हॉकीपटू यादी : कृष्णन बहाद्दुर पाठक, पी. आर. श्रीजेश, सुरज करकेरा, पवन, प्रशांतकुमार चौहान, जर्मनप्रीत सिंग, सुरिंदरकुमार, हरमनप्रित सिंग, वरुणकुमार, अमित रोहिदास, गुरिंदर सिंग, जुगराज सिंग, मनदीप मोर, निलम संजीब झेस, यशदीप सिवाच, दीपसेन तिर्की, मनजित, मनप्रित सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, एम. रविचंद्र सिंग, समशेर सिंग, निलकांत शर्मा, राजकुमार पाल, सुमित, आकाशदीप सिंग, गुरुजंत सिंग, मोहमद राहिल मोसीन, मनिंदर सिंग, एस. कार्ति, मनदीप सिंग, ललितकुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजित सिंग, सिमरनजित सिंग, शिलानंद लाक्रा आणि पवन राजबर.