वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या पुरुष आणि महिला बॅडमिंटनपटूंची ताजी मानांकन यादी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीला दुहेरीच्या ताज्या मानांकनात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. सात्विक आणि चिराग यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक तसेच त्यानंतर गेल्या वर्षी फ्रेंच खुली सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. सात्विक आणि चिराग या जोडीने अलीकडच्या गेल्या 12 स्पर्धांमधून 74,651 गुण नोंदवले आहेत. या मानांकन यादीत भारताचा एस. एस. प्रणॉय आठव्या स्थानावर तर किदांबी श्रीकांत 20 व्या स्थानावर आहेत.