नवी दिल्ली
येणाऱया काळात मोबाईल तंत्रज्ञान उद्योग, गेमिंग, वित्त तंत्रज्ञान आणि शिक्षण तंत्रज्ञान यांचा विस्तार वाढणार असून या क्षेत्रात कुशल उमेदवारांची मागणी वाढणार असल्याचे मत टीमलीज या कंपनीने नोंदवले आहे.
कर्मचाऱयांचे समाधान करणारी कंपनी टीमलीज यांनी यासंदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे. कंपनीच्या मते, येणाऱया काळात 5 जी इंटरनेट सेवा गतीमान झाली तर वरील क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी नव्याने उत्पन्न होणार आहेत. मोठय़ा प्रमाणात नव्या उमेदवारांची भरती होणार आहे. गेमिंग, फिनटेक आणि एज्युटेक क्षेत्रात युवा उमेदवारांची संख्या वाढत असून मोबाइल ऍप्लीकेशन तंत्रज्ञानाने 6 हजारहून अधिक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. या पदांवर पुढील काही महिन्यात नव्याने उमेदवारांची भरती होणार आहे. मोबाइल ऍप, विशेषतः गेमिंग, फिनटेक, हेल्थटेकसारख्या विविध क्षेत्रांमध्ये रोजगार वृद्धि होईल.