बंद खोलीत मुलीकडच्यांनी धू धू धुतले
5 वेळा मुलगी बघण्याचा कार्यक्रम केल्यावर आणि मुलीच्या घरी पाहुणचार घेतल्यावर तसेच साखरपुडा उरकल्यावर मुलीत दोष काढणाऱया नियोजित वराची चांगलीच धुलाई करण्यात आली आहे. या मारहाणीची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महाराष्ट्रातील अकोला जिल्हय़ाच्या खापरखेड येथील रहिवासी असलेल्या युवकाने बुलढाणा जिल्हय़ातील आलमपूर गावातील मुलीला एक, दोन वेळा नव्हे तर चारवेळा स्वतःचे नातलग आणि मित्रांसोबत बघण्याचा कार्यक्रम केला होता.
मुलीकडच्यांनी प्रत्येकवेळी मुलासोबत आलेल्या लोकांचाही उत्तम पाहुणचार केला. मुलगी पसंतही पडली आणि साखरपुडाही झाला. पण पाचव्यांदा पुन्हा पाहुण्यांना घेऊन तो मुलगी पहायला पोहोचला आणि अखेरीस ‘मुलीच्या डोळय़ात दोष आहे’ असे म्हणत मुलीला त्याने नापसंत केले. विवाहाच्या मुहूर्ताच्या काही दिवसांपूर्वीच मुलाने हा अडथळा निर्माण केला होता.
या प्रकारामुळे संतप्त मुलीच्या कुटुंबीयांनी नियोजित वर आणि त्याच्यासोबत आलेल्या लोकांना खोलीत बंद करून मार देण्यास सुरुवात केली. मारहाणीची ही चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संबंधित युवकाला कारमध्ये बसेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे.