उत्तर गारो हिल्ससह नजिकच्या राज्यांमध्ये जाणवले धक्के
वृत्तसंस्था/ शिलाँग
मेघालयच्या उत्तर गारो हिल्समध्ये सोमवार, 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:15 वाजता 5.2 तीव्रतेचा भूकंप झाला. याचे धक्के आसामसह आसपासच्या राज्यांमध्ये जाणवले. तसेच चीनमध्येही याची तीव्रता जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती तातडीने उपलब्ध झाली नसल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मेघालय व्यतिरिक्त आसाम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपामुळे लोक घाबरून घराबाहेर पडल्याचे दृश्य ठिकठिकाणी दिसून आले. यापूर्वी रविवारी मध्यरात्री 11.26 वाजता हरियाणाच्या रोहतकमध्ये 2.6 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता.