रायगड :
छत्तीसगडच्या रायगड शहरातील एका बॅकेत व्यवस्थापकावर चाकूने वार करत 5 कोटी रुपये लुटण्यात आले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील सर्व मार्गांवर नाकाबंदी करत आरोपींचा शोध चालविला आहे. 7-8 गुंडांनी हा दरोडा टाकल्याची माहिती पोलीस अधीक्षक सदानंद कुमार यांनी दिली आहे. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी प्रथम परिसराची अन् बँकेची रेकी केली होती. मग काही आरोपी कारने बँकेत पोहोचले हेते. बँकेबाहेरील सीसीटीव्हीमध्ये आरोपींचे फुटेज कैद आहेत.